माहिती अधिकार
माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 (1) (ख) मधील तरतूदीनुसार 17 बाबी (स्वयं प्रकटीकरण) बाबत माहिती.
केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4 (1 ) (ख) रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, कार्यालयाची रचना, कार्य व कर्तव्ये यांचा तपशील
कलम 4 (1) (ख) (एक)
मुंबई येथील रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, या कार्यालयातील कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल | ||
---|---|---|
1 | कार्यालयाचे नाव | रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई |
2 | कार्यालयाचा पत्ता | रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, 2 रा मजला ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग,बेलार्ड इस्टेट,मुंबई |
3 | विभागप्रमुख/ कार्यालय प्रमुख | सचिव |
4 | प्रशासकीय विभागाचे नाव | पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय मुंबई |
5 | मंत्रालयातील कोणत्या खात्याच्या अधिनस्त | कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त |
6 | कार्यक्षेत्र | 820 चौ. फूट |
7 | महाराष्ट्र राज्य/ कार्यानुरुप | महाराष्ट्र राज्य |
8 | विशिष्ट कार्य | राजस्तरीय कार्यालय |
9 | धोरण | रंगमंचावर सादर होणा-या कार्यक्रमांना योग्यता प्रमाणपत्र देणे. |
10 | सर्व संबंधित कर्मचारी | वर्ग = ब-1, क- 6, ड-1 एकूण = 08 |
11 | मालमत्तेचा तपशिल | मॅट्रो प्रकल्पाअंतर्गत बेलार्ड ईस्टेट येथील इमारतीमध्ये दुस-या मजल्यावर कार्यालय आहे. जागेचा तपशिल 800 स्क्वेअर फूट |
12 | उपलब्ध सेवा | दूरध्वनी, संगणक, ई.मेल, ऑनलाईन सेवा |
13 | संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील | दिला आहे. |
14 | कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक व वेळ | 022- 35102885 सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 |
15 | साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा | शनिवार/रविवार शासकीय सुट्टी व्यतिरिक्त कार्यालयीन कामाचे दिवस |

कलम 4 (1) ( ख) (दोन)
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील.
अ
अ.क्र. | पदनाम | अधिकार आर्थिक | कोणत्या कायद्या/ नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकानुसार | अभिप्राय |
---|---|---|---|---|
1 | सचिव | अधिकार आर्थिक | शा.नि. सा.प्र.वि.क्र.जीझेड आर-1064-29329-बी-सचिवालय, मुंबई - 32 दिंनाक 21/10/1964 अन्वये राज्य स्तरीय विभागप्रमुख म्हणून घोषित, मुंबई वित्तीय नियम 1959, महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम 1965, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका- 1978 नुसार |
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा तपशिल.
अ.क्र. | पदनाम | कर्तव्य व जबाबदा-या | कोणत्या कायदा/ नियम/ शासन निर्णय/ परिपत्रकानुसार | अभिप्राय |
---|---|---|---|---|
1 | सचिव | नियंत्रण अधिकारी व कार्यालय प्रमुख म्हणून सर्व कर्तव्ये पार पाडणे तसेच विभागाशी संबंधित विविध योजनाची अंमलबजावणी करणे. | ||
2 | अधिक्षक | कार्यालयीन अधिक्षक पदाची सर्व कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडणे | सेवाप्रवेश नियमानुसार पदाची कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडणे | |
3 | वरीष्ठ लिपिक | पदाशी संबंधित लेखा (कॅश बुक/GPF/Paybill, खर्चमेळ, मानधन बिल, खर्चमेळ चलन इत्यादी) व आस्थापना संबंधित सर्व कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडणे | सेवाप्रवेश नियमानुसार पदाची कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडणे | |
4 | लिपिक-टंकलेखक | कार्यालयीन लिपिक वर्गीय व टंकलेखनाचे विषयाच्या वाटपानुसार नेमुन दिलेली कामे करणे | सेवाप्रवेश नियमानुसार पदाची कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडणे | |
5 | लघुलेखक ( करार पध्दतीने) | कार्यालयीन विषयाच्या वाटपानुसार नमुद दिलेली कामे व सचिव, अध्यक्ष यांचे कामकाज पाहणे | सेवाप्रवेश नियमानुसार पदाची कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडणे | |
6 | सचिव | नियंत्रण अधिकारी व कार्यालय प्रमुख म्हणून सर्व कर्तव्ये पार पाडणे तसेच विभागाशी संबंधित विविध योजनाची अंमलबजावणी करणे. | ||
7 | शिपाई | कार्यालयीन विषयाच्या वाटपानुसार नमुद दिलेली कामे व सचिव, अध्यक्ष यांचे कामकाज पाहणे | सेवाप्रवेश नियमानुसार पदाची कर्तव्ये व जबाबदा-या पार पाडणे |
कलम 4 (1) (ख) (तीन)
कार्यालयाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती,
कामाचे स्वरुप :- रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची रचना, कार्य व कर्तव्य यांचा तपशिल
सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे पूर्वपरिक्षण करण्यासाठी मुंबई पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 33
- (wa)(iii) अन्वये दिंनाक 05 जानेवारी 1954 रोजीच्या अधिसूचनेनुसार गृह विभागामार्फत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा ( सिनेमाव्यतिरिक्त) आणि सार्वजनिक मनोरंजनाचे प्रयोग मेळे व तमाशा धरुन यांना अनुज्ञप्ती देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे - नियम 1960 व सुधारीत नियम 1974 मधील नियम 137 ते 145 (अ) अन्वये रंगभूमी मंडळाची कार्यपध्दती तसेच अनुसरावयाची सर्वसाधारण तत्वे निश्चित करण्यात आली आहेत.
- सदर कार्यपध्दतीनूसार मंडळाकडून सार्वजनिक ठिकाणी सादर होणा-या मनोरंजनाच्या (नाटक/ एकांकिका/ लोकनाटय/तमाशा /वग/ मेळे इत्यादी) कार्यक्रमासाठी नागरिकांनी सादर केलेल्या लिखाणांचे अशासकीय सदस्यांकडून पूर्वपरिक्षण करुन त्यांना अध्यक्षांच्या मान्यतेने कायमस्वरुपी योग्यता प्रमाणपत्र (Suitability Certificate) देण्यात येते.
- सार्वजनिक करमणूकीच्या कार्यक्रमांमुळे सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता ,नितीमत्ता तसेच देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षितता, एकात्मता यांना बाधा येणार नाही. व कोणत्याही प्रकारे कायदयाचे उल्लघन होणार नाही. याची दक्षता घेणे हा पूर्वपरिक्षणामागचा उद्देश आहे. या उदिष्टपूर्तीसाठीच आधारभूत संहितेच्या लिखाणाचे पूर्वपरिक्षण मंडळाकडून करण्यात येते.
सन 1972 मध्ये हे मंडळ गृह विभागाकडून तात्कालीन सामाजिक न्याय क्रिडा व सांस्कृतिक विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले. सन 2006 मध्ये सांस्कृतिक विभाग सामाजिक न्याय विभागापासून वेगळा झाला आणि तेव्हा पासून हे मंडळ सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित कार्यरत आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या अंतर्गत असलेल्या Rules For Licencing & Contrding Places Of Public Amusements 1960 च्या नियमांमध्ये 1974 मध्ये सुधारणा करण्यात आल्या, त्यानुसार सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा (सिनेमाव्यतिरिक्त) आणि मेळे, व तमाशा धरुन, सार्वजनिक मनोरंजनाचे प्रयोग आणि अनुज्ञप्ती देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे ( 9 वी सुधारणा ) नियम 1974 मधील नियम 137 ते 145 (अ) नुसार मंडळाचे कार्य चालते. - रंगभूमी मंडळावर अध्यक्ष व अशासकीय सदस्यांची नियुक्ती शासनामार्फत केली जाते. व ही नियुक्ती तीन वर्षासाठी किंवा शासन आदेशित करील त्या कालावधी पर्यंत असते. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्र. एसपीबी-2022/ प्र.क्र. 44/ सां.का. 1/ दिंनाक 13 ऑक्टोबर 2022 नुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबतची कार्यपध्दत निश्चित करण्यात आली आहे. मंडळाकडे येणा-या लिखाणाचे (Scripts) परिक्षण सदस्य करतात व अध्यक्षाच्या मान्यतेने सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम सादर करण्यासाठी मंडळातर्फे प्रमाणपत्र दिले जाते. सन 1954 पासून परिनिरीक्षण झालेल्या नाटक/एकांकिका/तमाशा/मेळा/ इत्यादीच्या संहिता व इतर दस्तावेज पुराभिलेख संचालनालयाच्या अभिलेख कक्षात तसेच रंगभूमी मंडळाच्या चित्रनगरी गोरेगांव, मुंबई येथील अभिलेख कक्षात जतन करुन ठेवण्यात येतो व सदर दस्तावेजाचे संगणकीकरण (Digitization ) करण्यात येते.
- रंगभूमी मंडळातील अशासकीय सदस्यांकडून मराठी व हिंदी भाषेतील लिखाणांचे परिक्षण केले जाते या व्यतिरिक्त गुजराती, कोकणी, मळयालम, तामिळ, तेलगू, उर्दु, बंगाली, तुलु, राजस्थानी,सिंधी पंजाबी, इत्यादी लिखाणांचे पूर्व परीक्षण करण्यासाठी मानसेवी वाचकांची नियुक्ती मंडळाच्या अध्यक्ष याचे कडून केली जाते.
- पूर्व परिक्षणाची कार्यपध्दती :-
- अर्जदाराने मंडळाच्या कार्यालयातून नमुना “ आय फार्म” ( अर्जाचा छापील नमुना) प्राप्त करुन त्यातील संपूर्ण तपशील भरुन व अर्जाला रुपये 2 चा न्यायालयीन शुल्क मुद्रांक (कोर्ट फी स्टॅम्प) लावून तो अर्ज लिखाणाच्या दोन प्रतीसह या कार्यालयाकडे टपालाने/स्वत: सादर करता येईल.
सदर अर्जाचा नमुना ( आय फॉर्म) मंडळाच्या mumbairangbhumi@gmail.com या Email Site वर ही संपर्क साधून प्राप्त करता येईल. - पूर्वपरिक्षणाचा अर्ज www.aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेत स्थळावरुन Online पध्दतीने ही सादर करता येतो.
- लिखाणाच्या प्रती स्पष्ट व सुवाच्च अक्षरात कागदाच्या एकाच बाजूला लिहिलेल्या अथवा टंकलिखित केलेल्या आणि व्यवस्थित आवरण घातलेल्या असणे आवश्यक आहे.
- पूर्वपरिक्षण शुल्क केवळ रोखीने अथवा मनिऑर्डरने स्वीकारले जाईल. ते चलन/चेक/ पोस्टल ऑर्डर किंवा इतर पध्दतीने स्वीकारले जात नाही.
- अर्ज प्रत्यक्ष सादर करताना कार्यालयीन वेळेत दुपारी 5.00 पर्यंत पूर्वपरीक्षण फी सह स्वीकारला जाईल.
- सर्व आवश्यक बाबीची पूर्तता झाल्याखेरीज परिक्षणाबाबत पुढील कार्यवाही केली जाणार नाही.
- अर्जदाराने मंडळाच्या कार्यालयातून नमुना “ आय फार्म” ( अर्जाचा छापील नमुना) प्राप्त करुन त्यातील संपूर्ण तपशील भरुन व अर्जाला रुपये 2 चा न्यायालयीन शुल्क मुद्रांक (कोर्ट फी स्टॅम्प) लावून तो अर्ज लिखाणाच्या दोन प्रतीसह या कार्यालयाकडे टपालाने/स्वत: सादर करता येईल.
- सार्वजनिक ठिकाणी होणारा कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम ज्याला संहिता आहे तसेच ज्या कार्यक्रमांना संहिता नाही तथापि, निश्चित केलेले निवेदन/ सारांश (Synopsis) आहे अशा कार्यक्रमांना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. यास्तव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय, शासन निर्णय क्र. एसपीबी-2016/ प्र.क्र.244/ सां.का.1 दिंनाक 27 ऑक्टोबर 2017 अन्वये रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून देण्यात येणा-या कार्यक्रमांच्या संहितांना मान्यता/ योग्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक असलेल्या बाबी निश्चित केलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे:-
अ.क्र. मंडळाची मान्यता/ योग्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक असलेल्या बाबी. 1 नाटक : प्रायोगिक/ व्यावसायिक 2 एकांकिका 3 लोकनाटय ( 2 किंवा 3 अंकासाठी) 4 तमाशा /वग 5 संगीतबारी मराठी गीते 6 मेळे 7 प्रमाणपत्राची नक्कल 8 संबंधित व्यक्तीना नाटयसंहिता उपलब्ध करुन देणे 9 शीर्षक बदल 10 पुरस्कार वितरण सोहळयामध्ये होणा-या मनोरंजनाच्या कार्यक्रमांची संहिता ( Script) तसेच निवेदन/ रुपरेषा/ सारांश (Synopsis). 11 जे मनोरंजाचे कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी सादर केले जाणार आहेत व ज्यांना संहिता अथवा सारांश ( Synopsis) /निवेदन/निश्चित रुपरेषा आहे असे सर्व कार्यक्रम. उपरोक्त तक्त्यात नमुद केलेली यादी ही सर्वसमावेशक नाही कारण, भविष्यात विविध नाविन्यपूर्ण असे मनोरंजाचे कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी आयोजित केले जातील. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करताना. कायदयाचे उल्लंघन होणार नाही/राज्याची सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नितीमत्ता यांस बाधा येणार नाही/न्यायालयाचा अवमान होणार नाही, हा योग्यता प्रमाणपत्र देण्यामागील मूळ उद्देश विचारात घेऊन, सार्वजनिक ठिकाणी होणारा कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम ज्यास संहिता (Script) आहे अथवा कार्यक्रमास निवेदन/ सारांश (Synopsis) आहे अशा कार्यक्रमांना रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
सध्या या मंडळावर 1 अध्यक्ष व 44 सदस्य आहेत. अध्यक्षांना दरमहा रुपये 15,000/- व सदस्यांना दरमहा रुपये 2,500/- मानधन देण्यात येते. इतर भाषेचे पूर्वपरिक्षण करणा-या मानसेवी वाचकांना तीन अंकी नाटकाला रुपये 100/- व इतर लहान लिखाणासाठी रुपये 50/- मानधन दिले जाते.
- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय शासन निर्णय एसपीबी-2010/प्र.क्र. 291/ सां.का. 1 दिंनाक 12 ऑक्टोबर 2010 अन्वये रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून सार्वजनिक करमणूकीच्या कार्यक्रमांसाठी योग्यता प्रमाणपत्राकरिता आकारण्यात येणारे पूर्वपरिक्षण शुल्क खालील प्रमाणे निश्चित केलेले आहे.
अ.क्र. लिखाणाचा तपशील परिक्षण शुल्क 1 नाटक - प्रायोगिक
व्यावसायिकरु. 250/-
रु. 1000/-2 एकांकिका रु. 100/- 3 लोकनाटय ( दोन किंवा तीन अंकासाठी) रु. 250/- 4 तमाशा/ वग रु. 100/- 5 संगीतबारी- मराठी गीते रु. 250/- 6 मेळे रु. 100/- 7 सप्ततारांकित हॉटेल 3 स्टार/ 4 स्टार/ 5 स्टार/ क्लब/जिमखाना या ठिकाणी चालणारे मनोरंजनाचे कार्यक्रम रु. 1000/- 8 प्रमाणपत्राची नक्कल रु. 100/- 9 संबंधित व्यक्तीना नाटयसंहिता उपलब्ध करुन देणे रु. 100/- 10 शीर्षक बदल रु. 100/- - इतर तपशिलाबाबत :-
सचिव, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र शासन, कार्यालयांच्या इतर तपशिलाबाबत खालील पत्यावर संपर्क साधावा. - कार्यालयाचा पत्ता :- 2 रा मजला ठाकरशी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट मुंबई - 400 001
Email id :- mumbairangbhumi@gmail.com
दूरध्वनी क्रमांक :- 022- 35102885
मंडळाचे पदाधिकारी :-
संपर्क क्र. :- ९८२०९६०३४७
mail. Id - vijaygokhale@gmail.com
संपर्क क्र. :- 9819015316
2. अधिक्षक :- श्री. दि. चं. वाघमारे
संपर्क क्र. :- 9869386221 mail. Id :- mumbairangbhumi@gmail.com
अ.क्र. | कामाचे स्वरुप | कालावधी दिवस | कामासाठी जबाबदार अधिकारी | अभिप्राय |
---|---|---|---|---|
1 | माहितीचे सर्वेक्षण व संकलन | 1 महिना | अधीक्षक, रंगभूमी मंडळ | - |
2 | लेखन | |||
3 | अंतिम संपादन | |||
4 | मुद्रण |
टिप :- कलम 4 (1) (ख) (3)
1. शासनाचे नियुक्त केलेल्या संपादक मंडळाने निर्देशित केल्याप्रमाणे कामाचा प्राधान्यक्रम ठरतो
निश्चित केलेल्या कालावधीत प्रत्येक महिन्यात पूर्ण केल्याचा प्रयत्न होतो.
सचिव- अ) नियमानुसार ठराविक कालावधीत कामाचा निपटारा करण्यात येतो.
ब) आलेल्या संहिता मंडळाच्या सदस्यांकडे परीक्षणासाठी पाठविणे.
क) मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे.
कलम 4 (1) (ख) (चार)
कार्यालयाची कार्ये पार पाडण्यासाठी सेवा हमी कायदयानूसार कालमर्यादा / मानके ठरविण्यात आली आहेत.
अ.क्र. | सेवांचा तपशिल | सेवा पुरविण्याची विहित मुदत |
---|---|---|
1 | ऑकेस्ट्रा तमाशा, मेळा, नाटक आयोजित करण्यासाठी प्रमाणपत्र देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी होणा-या एक दिवसाच्या कार्यक्रमाना ना- हरकत प्रमाणपत्र देणे (उपरोक्त नमुद ऑकेस्ट्रा या कार्यक्रमास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी 2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही) | सेवा हमी कायदयानुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाचे 10 दिवस |
2 | सर्व भाषेतील प्रायोगिक/ व्यावसायिक नाटय संहितांना प्रमाणपत्र देणे | सेवा हमी कायदयानुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाचे 10 दिवस |
कलम 4 (1) (ख) (पाच)
शासकीय कार्य पार पाडण्यासाठी कर्मचारीवर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना नियमपुस्तिका
अ.क्र. | अधिनियम/ नियम व शासन निर्णय |
---|---|
1 | मुंबई पोलीस अधिनियम 1951 (मराठी) |
2 | रंगभूमी मंडळाच्या निर्मितीची अधिसूचना दि.05-01-1954 |
3 | रंगभूमी मंडळाची दैनदिन कार्यपध्दती, शासन निर्णय दि.19-07-1954 |
4 | सार्वजनिक मनोरंजानाचे प्रयोग यांना अनुज्ञप्ती देणे व नियंत्रण ठेवणे. नियम - 1974 (मराठी) व (इंग्रजी) |
5 | रंगभूमी मंडळाची लोकसेवा हक्क अधिनियम अधिसूचना दि.04-09-2015 |
6 | Ease of doing business अंतर्गत सुधारणा, शासन निर्णय दि. 27-10-2017 |
7 | अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबत कार्यपध्दती शासन निर्णय दि.13-10-2022 |
कलम 4 (1) (ख) (सहा)
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या कार्यालयामध्ये दस्ताऐवाजांची वर्गवारी
अ.क्र. | विषय | दस्ताऐवजाचा प्रकार नस्ती/मस्टर/नोंदपुस्तक, व्हाऊचर इ. | प्रमुख बाबीचा तपशीलवार | सुरक्षित ठेवण्याचा कालावधी वर्षे | |
---|---|---|---|---|---|
1 | लेखाविषयक | 1 | सन 1954 ते आजपर्यंत संहितांच्या स्थळप्रती जतन करण्यात आलेल्या आहेत. | अनु.3 प्रमाणे | कायमस्वरुपी |
2 | कॅशबुक | 20 | |||
3 | कार्यालयीन खर्च, विनियोजन लेखे, खर्चमेळ, वेतन देयके, दौरा देयके इ. | 5 | |||
2 | आस्थापना | 1 | अर्जित रजा नोंदवही | अनु.3 प्रमाणे | 3 |
2 | सेवा प्रवेश नोंदवही | 5 | |||
3 | सेवा निवृत्ती शासन निर्णय | 5 | |||
4 | सेवानिवृत्ती कर्मचा-यांची सेवापुस्तके | 5 | |||
5 | वेतन निश्चिती फाईल | कायमस्वरुपी | |||
6 | सर्व प्रकारची अग्रिम नस्ती | कायमस्वरुपी | |||
7 | कार्यालयीन नस्ती | कायमस्वरुपी | |||
8 | ऑडीट | कायमस्वरुपी | |||
9 | मुदतवाढी संबंधीत | कायमस्वरुपी | |||
10 | शासकीय निवास्थान | कायमस्वरुपी | |||
3 | आवक-जावक लिपिक | 1 | आवक जावक नोंदवही | अनु.3 प्रमाणे | 5 |
2 | मुव्हमेंट रजिस्टर | 5 | |||
3 | मुद्रांक नोंदवही | 5 |
कलम 4 (1) (ख) (सात)
कार्यालयाचे धोरण किंवा अंमलबजावणी करण्याबाबत परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था.
महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण रंगभूमी मंडळ कार्यालयाचे अध्यक्ष व सदस्य कार्यालयाचे कर्मचारी याची प्रत्येक जिल्हयांमध्ये दर 2 ते 3 महिन्यांनी बैठक आयोजित करण्यात येते. यामध्ये सदर जिल्हयांतील स्थानिक नागरिकांना येणा-या शासकीय कामकाजामधील अडचणी/ रंगभूमी कार्यालयाच्या अडचणी ऐकून घेऊन त्यावर चर्चा करुन पर्याय काढण्यात येतो. कार्यालयाचे स्वतंत्र संकेतस्थळे असून ते कार्यान्वित आहे. नागरिक या संकेतस्थळाचा उपयोग करीत आहेत.
कलम 4 (1) (ख) (आठ)
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या कार्यालयाच्या समितीची यादी/ बैठकीची कार्यवृत्ते/ वार्षिक अहवाल
अ.क्र. | समितीचे नाव | समितीचे सदस्य | समितीचे उदिष्टे | किती वेळा घेण्यात येते | सभा जन-सामान्यांसाठी | सभेच्या कार्यप्रवृत्तांत (उपलब्ध) |
---|---|---|---|---|---|---|
1 | रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ | अध्यक्ष - 1 सदस्य -44 | रंगमंचावर सादर होणा-या कार्यक्रमांना योग्यता प्रमाणपत्र देणे | दरमहा एक बैठक | नाही | आहे |
कलम 4 (1) (ख) ( नऊ)
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचा-यांची निर्देशिका
अ.क्र. | वर्ग | अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम |
---|---|---|
1 | सचिव | श्री. संतोष.पुं. खामकर, सचिव, (गट-ब) ( राजपत्रित) |
2 | अधीक्षक | श्री. दिलिप. चं. वाघमारे, अधीक्षक, (गट -क) |
3 | वरिष्ठ लिपिक | श्री. शरद. मा. सागवेकर, वरिष्ठ लिपिक, (गट -क) |
4 | लिपिक- टंकलेखक | श्री. दत्तात्रय. अ. कुंभार, लिपिक- टंकलेखक (गट -क) |
श्रीमती. प्रतिक्षा. र. विनेरकर, लिपिक- टंकलेखक (गट -क) |
||
रिक्त लिपिक- टंकलेखक, (गट -क) |
||
रिक्त लिपिक- टंकलेखक, (गट -क) |
||
5 | शिपाई | श्री. अनुराग अ. गरुड, शिपाई, (गट -ड) |
कलम 4 (1) (ख) (दहा)
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचा-यांचे मासिक वेतन
अ.क्र. | वर्ग | अधिकारी कर्मचारी यांचे नाव व पदनाम | 7 व्या वेतन आयोगानुसार मिळाणारे वेतन | इतर भत्ते |
---|---|---|---|---|
1 | सचिव | श्री. संतोष.पुं. खामकर, सचिव, (गट-ब) ( राजपत्रित) |
रु. 65,100 | (शासकीय नियमानुसार मिळणारे इतर भत्ते ) |
2 | अधीक्षक | श्री. दिलिप. चं. वाघमारे, अधीक्षक, (गट -क) |
रु. 53,000 | |
3 | वरिष्ठ लिपिक | श्री. शरद. मा. सागवेकर, वरिष्ठ लिपिक, (गट -क) |
रु. 44,800 | |
4 | लिपिक- टंकलेखक | श्री. दत्तात्रय. अ. कुंभार, लिपिक- टंकलेखक (गट -क) |
रु. 28,700 | |
श्रीमती. प्रतिक्षा. र. विनेरकर, लिपिक- टंकलेखक (गट -क) |
रु. 21,100 | |||
रिक्त लिपिक- टंकलेखक, (गट -क) |
- | |||
रिक्त लिपिक- टंकलेखक, (गट -क) |
- | |||
5 | शिपाई | श्री. अनुराग अ. गरुड, शिपाई, (गट -ड) |
रु. 16,500 |
कलम 4 (1) (ख) ( अकरा)
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या कार्यालयातील योजनाचा तपशिल
मराठी नाटय संहितांचे संगणकीकरण
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून सार्वजनिक ठिकाणी सादर होणा-या मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी ( नाटक/एकांकिका /लोकनाटय /तमाशा वर्ग/ मेळे इत्यादी ) नागरिकांनी तपासणीसाठी सादर केलेल्या लिखाणांचे पूर्वपरिक्षण करुन त्यांना कायमस्वरुपी योग्यता प्रमाणपत्र देण्यात येते. या कायमस्वरुपी जतन करावयाच्या “अ” वर्गीय दस्तावेजाचे (संहिता/ प्रमाणपत्र व त्यांच्या नोंदवहया इत्यादी) संगणकीकरण (Digitization ) मंडळा मार्फत मराठी नाटयसंहितांचे संगणकीकरण (कार्यक्रम) (22053152) इतर प्रशासकीय खर्च (20) या योजने अंतर्गत दरवर्षी करण्यात येते.
कलम 4 (1) (ख) ( बारा)
अर्थसाहाय्य कार्यक्रमांच्या अंकलबजावणीसाठी वाटप रक्कमा व कार्यक्रमांच्या लाभाधिका-यांचा तपशिल
लागू नाही
कलम 4 (1) (ख) ( तेरा)
व्यक्तीना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे याबाबतची माहिती -
लागू नाही
कलम 4 (1) (ख) ( चौदा)
इलेक्ट्रॉनिक स्वरुपात उपलब्ध असलेल्या किंवा कार्यालयात उपलब्ध असलेल्या माहिती संबंधातील तपशिल.
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या 4 ( ख) अन्वये प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने प्रसिध्द करावयाची माहिती रंगभूमी कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच सदर माहिती रंगभूमी मंडळाच्या संकेतस्थळावर (https://rangbhumi.maharashtra.gov.in) प्रसिध्द करण्यात आली आहे.
कलम 4 (1) (ख) ( पंधरा)
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.
उपलब्ध सुविधा
- वेबसाईट
- अभिलेख तपासणीसाठी सुविधा
- सूचना फलक
- अभिलेख कक्ष
अ.क्र. | सुविधेचा प्रकार | वेळ | कार्यपध्दती | ठिकाण | जबाबदार व्यक्ती/ कर्मचारी | तक्रार निवारण |
---|---|---|---|---|---|---|
1 | टंकलिखित संहिता उपलब्ध | कार्यालयीन वेळेत | संबंधित अर्जदाराने मागणी केल्यानुसार | मुंबई येथील रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ | सचिव/ अधीकक्ष | अधीक्षक |
कलम 4 (1) (ख) (सोळा)
मुंबई येथील रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/ सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/ अपिलीय प्राधिकारी ( तेथील लोक प्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.
अ) अपिलीय अधिकारी
अ.क्र. | अपिलीय अधिका-यांचे नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता/फोन | ई-मेल | अपिलीय प्राधिकारी |
---|---|---|---|---|---|---|
1 | श्री. स.पुं. खामकर | सचिव | महाराष्ट्र राज्य | कार्यालयीन पत्यावर फोन नं. 022- 35102885 | mumbairangbhumi@gmail.com | श्री. सं.पुं. खामकर ( सचिव) |
ब) शासकीय माहिती अधिकारी-
अ.क्र. | शासकीय माहिती अधिका-यांचे नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता/फोन | ई-मेल | अपिलीय प्राधिकारी |
---|---|---|---|---|---|---|
1 | श्री. दिलीप चं. वाघमारे | अधीक्षक | महाराष्ट्र राज्य | कार्यालयीन पत्यावर फोन नं. 022- 35102885 | mumbairangbhumi@gmail.com | श्री. सं.पुं. खामकर ( सचिव) |
क) सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी
अ.क्र. | शासकीय माहिती अधिका-यांचे नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | पत्ता/फोन | ई-मेल | अपिलीय प्राधिकारी |
---|---|---|---|---|---|---|
1 | श्री. शरद म. सागवेकर | वरिष्ठ लिपिक | महाराष्ट्र राज्य | कार्यालयीन पत्यावर फोन नं. 022- 35102885 | mumbairangbhumi@gmail.com | श्री. सं.पुं. खामकर ( सचिव) |
कलम 4 (1) (ख) ( सतरा)
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या कार्यालयातील इतर माहिती
संहिता तपासणी - संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी सादर होणा-या मनोरंजन कार्यक्रमांच्या संहितांचे/ निवेदन/रुपरेषा इत्यादीचे पूर्वपरिक्षण करुन योग्यता प्रमाणपत्र दिल्याची मागील 10 वर्षातील माहिती
अ.क्र. | वर्ष | एकूण प्राप्त झालेल्या संहिता | एकूण निकाली काढलेल्या संहिता | दप्तरी दाखल केलेल्या संहिता (3-4) | संहिता पूर्वपरिक्षणासाठी लागलेला कालावधी | योग्यता प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिलेली टक्केवारी | शेरा |
---|---|---|---|---|---|---|---|
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
1 | 2015 | 1789 | 1774 | 15 | किमान दिड ते दोन महिने | 99% | स्तंभ 5 येथे “दप्तरी दाखल” असे दर्शविलेल्या संहिता या अर्जदारांस/लेखकांस आक्षेपार्ह भाग कळविल्यानंतर तसेच याबाबत 3 स्मरणपत्र पाठवूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त न झाल्यामुळे सदर प्रकरणे मंडळाच्या निर्णयानुसार दप्तर दाखल करण्यात आलेली आहेत. |
2 | 2016 | 1754 | 1725 | 29 | 98% | ||
3 | 2017 | 2210 | 2198 | 12 | 99% | ||
4 | 2018 | 2319 | 2277 | 42 | 98% | ||
5 | 2019 | 2530 | 2518 | 12 | 99% | ||
6 | 2020 | 591 | 590 | 01 | 99% | ||
7 | 2021 | 1489 | 1481 | 08 | 99% | ||
8 | 2022 | 1960 | 1930 | - | 99% | ||
9 | 2023 | 2480 | 2477 | 03 | 99% | ||
10 | 2024 | 2456 | 2450 | 06 | 99% |